गुन्हा दाखल होताच संतोष बांगर संतापले, म्हणाले, त्या प्राचार्याला मारल्याशिवाय राहणार नाही'



हिंगोलीतील शासकीय पॉलिटेक्निकच्या प्राचार्याला मारहाण प्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पण, माझ्यावरील गुन्हे खोट्या स्वरूपाचे आहेत. या प्राचार्यावर यापूर्वी देखील गंभीर गुन्हे आहेत, याकडे लक्ष द्यायला हवे. प्राचार्यावर गुन्हे दाखल करून त्याला सस्पेंड करायला हवं. हा प्राचार्य जर आया बहिणीची इज्जत काढत असेल तर त्याला मारल्याशिवाय राहणार नाही' असा इशाराच आमदार संतोष बांगर यांनी दिली.

प्राचार्याला मारहाण प्रकरणी संतोष बांगर यांच्यासह 40 जणांवर गुन्हे दाखल झाले आहे. यामुळे संतोष बांगर कमालीचे संतापले. 'माझ्यावर हा खोटा गुन्हा दाखल झाला आहे, त्याची मला पर्वा नाही परंतु या प्राचार्याने दहा दिवसात तक्रार का दिली नाही. प्राचार्याची महाराष्ट्रातून तेरा ठिकाणाहून बदली झाली आहे.

कोल्हापुरात चंद्रकांत पाटलांनी देखील या प्राचार्याची कान उघडणी केली होती. यापूर्वी या प्राचार्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत. आया बहिणींची इज्जत चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आम्ही शांत बसलो होतो. परंतु या लिंग पिसाट प्राचार्याला पायाच्या खाली तुडवल्याशिवाय राहू नये.

असं माझं मत आहे' अशी संतप्त प्रतिक्रिया बांगर यांनी दिली.
'आमच्या समोर कोणी महिलांची इज्जत काढत असेल तर हा संतोष बांगर त्या प्राचार्याला मारल्याशिवाय राहणार नाही. या प्राचार्यांनी यापूर्वी देखील अनेक गुन्हे दाखल आहेत.

या महाराष्ट्रामध्ये आई बहिणीच्या अब्रु विषयी वाईट बोलणाऱ्या प्राचार्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. माझी विनंती आहे की वस्तुस्थिती माध्यमांनी दाखवावी. इथे जरी माझी चूक असेल तर मग कोल्हापूर, साकोली या ठिकाणी देखील प्राचार्याकडून असेच प्रकार घडले. या प्राचार्यावर साकोली येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले. या प्राचार्यावर ताबडतोब गुन्हे दाखल करून त्याला सस्पेंड करावं अशी माझी मागणी आमदार संतोष बांगर यांनी केली आहे.
दरम्यान, शासकीय कामात अडथळा सरकारी कर्मचाऱ्याला शिवीगाळ मारहाण प्रकरणी आमदार बांगर यांच्यासह पॉलीटेक्निक कॉलेजमधील तीन ते चार महिला प्राध्यापिका, पुरुष प्राध्यापकासह अंधार भांगरांच्या तीस ते चाळीस कार्यकर्त्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. प्राचार्य कक्षात येऊन मारहाण आणि कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणेचा डिव्हिआर तोडल्याप्रकरणी प्राचार्य डॉक्टर अशोक उपाध्याय यांच्या तक्रारीवरून रात्री उशिरा तीन वाजेच्या दरम्यानगुन्हा दाखल झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post