ब्रम्हपुरी नगरीत भरले आरोग्यधाम!

ब्रम्हपुरी नगरीत भरले आरोग्यधाम!


ब्रम्हपुरी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी आज सकाळी पंचशील वस्तीगृहाच्या पटांगणावर आरोग्याचे धाम भरले होते. केवळ उपचारासाठी पैसे नाहीत म्हणून गरजू नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित राहणार नाहीत ही खात्री करणे हेच ब्रम्हपुरी महोत्सव आरोग्य शिबिराचे पहिले आणि अंतिम ध्येय आहे. 


आरोग्य तपासणी, कर्करोग तपासणी, एचआयव्ही तपासणी, डोळे, दात तसेच कर्णतपासणी, पोटाचे आजार , त्वचा रोगतज्ज्ञ यांच्याकडून तपासणी, जरूर तो सल्ला आणि नंतर औषधांचे मोफत वाटप या गोष्टीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मुंबई,पुणे, नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सदर आरोग्य शिबीर पार पडले. 


गरजू व गरिबांना खर्चिक व तातडीच्या उपचारासाठी पैसे उपलब्ध नसल्यामुळे अनेक वेळा प्राण गमवावे लागल्याची माहिती सतत एकायला मिळते. गरीब व गरजू कुटुंबातील लोकांचे जीव वाचवायचे असेल तर वेळेवर आरोग्य तपासणी करून सुदृढ आरोग्याची खात्री करून घेणे ही पहिली पायरी आहे. यासाठी आरोग्य शिबीर मोलाचे ठरतात. मागील ३ ब्रम्हपुरी महोत्सवात केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये काही रुग्णांचे कॅन्सरचे निदान झाले होते. वेळेवर उपचार करून त्यांचे प्राण आम्ही वाचवू शकलो.

ब्रह्मपुरी शहराला सांस्कृतिक,क्रीडा, व आरोग्य वैभव प्राप्त झाले आहे. या वैभवांना ब्रह्मपुरी महोत्सव सातत्याने चालना देण्याचे काम करीत आहे याचा आनंद आहे. 

#bramhapuri #bramhaprimahotsav2023

Post a Comment

Previous Post Next Post