दर्पनकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघातर्फे सामाजिक कार्यकर्त्या गीता हिंगे नाशिक येथे "राष्ट्रीय दिपस्तंभ" पुरस्काराने सन्मानित*

दिनेश बनकर कार्यकारी संपादक
सुपर फास्ट बातमी 7822082216
गडचिरोली
आधारविश्व फाऊंडेशन, गडचिरोली च्या अध्यक्षा गीता हिंगे यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघ या राष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिनाचे औचित्य साधून शनिवार दि 7 जानेवारी रोजी नाशिक येथील मुं.श. औरंगाबादकर सभागृहात *राष्ट्रीय दिपस्तंभ* पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 समाजाला दिशा दाखविण्याचे व मार्गदर्शन करण्याचे काम करणार्‍या कर्तृत्ववान व्यक्तींना राष्ट्रीय दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
     या पुरस्कार सोहळ्यास महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, बिहार आदी राज्यातून पुरस्कारार्थी उपस्थित होते. 
     या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री मेघा पाटील, माजी मनपा सभागृह नेते व मा. नगरसेवक दिनकर अण्णा पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक डॉ. दिनेश क्षिरसागर, आंतरराष्ट्रीय जादुगार शिरीषकुमार हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून अभिनेत्री स्मिता प्रभू, आंतरराष्ट्रीय जादुगार स्नेहराज इंद्रजीत, डॉ. प्रा. शोभा सातभाई, ड्रीम डेस्टीनेशनच्या संचालिका शबनम खान, पैठणी उद्योजक अमोल शिंदे यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.गीता हिंगे यांना मिळालेल्या राष्ट्रीय दिपस्तंभ पुरस्कारमुळे सर्व स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.या पुरस्कारमुळे आधारविश्व फाऊंडेशनच्या शिरपेचात अजून एक मानाच्या तुऱ्याची भर पडली असे उदगार आधारविश्व फाऊंडेशनच्या सदस्यांनी काढले.

Post a Comment

Previous Post Next Post