बेलोना येरला रस्त्याची दुर्दशा :



जागोजागी खड्डे निकुष्ठ
बांधकामाचा नागरिकांचा आरोप
----------------------------------------राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी ता. 5
       बेलोना ते येरला, इंदोरा, गंगालडोह या तीन गावाना जोडणाऱ्या रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सुमारे तीन वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आले. परंतू या रस्त्याची सद्या चांगलीच दुर्दशा झाली असून जागोजागी खड्डे पडल्याने रहदारीला अडसर ठरत आहे. या रस्त्याचे बांधकाम निकुष्ठ दर्जाचे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे या रस्त्याचे सुमारे तीन वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले होते. हा रस्ता शेतकरी, तसेच शालेय विध्यार्थी नागरिकांन साठी एकमात्र रस्ता आहे रस्त्याचे बांधकाम निकुष्ठ झाल्यानंतर या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी केली गेली त्यानंतर दुरुस्तीची डागडुजी करण्यात आली विशेष म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत 83:80 लाख रुपयाच्या निधीतून या रस्त्याचे बांधकाम करण्यात आले देखभाल दुरुस्ती करिता 5: 70 लाख रुपयाच्या निधी एका वर्षासाठी प्रस्तावित केला होता. बांधकामा दरम्यान नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष करित रस्त्याचे बांधकाम थातुरमातुर करून घेतल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. 
       सद्य:स्थितीत खैरगांव ते परसोडी या रस्त्याचे काम सुरु असल्याने तेथील कामासाठी लागणाऱ्या साहित्याचे वाहतूक याचं रस्त्याने केली जात आहे. या जड वाहतुकीमुळे रस्ता आणखीन खराब झाला आहे रस्त्यातील खड्ड्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे अनेकदा शाळकरी विध्यार्थी व दुचाकी स्वार पडून किरकोळ जखमी झाले आहेत. त्यामुळे या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post