गणतंत्र दिवस साजरा..



बृहन्मुंबई महानगरपालिका पवई मनपा शाळा संकुल कांजूरमार्ग येथे 74 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला. पवई मनपा इमारत प्रमुख श्री भिकन देवरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाला. यानिमित्ताने शाळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते. तसेच पवई हिंदी शाला क्रमांक 2 च्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रमही करण्यात आला. जवळ जवळ 50 छोटे झाडे लावण्यात आली. पवई हिंदी मनपा क्रमांक 2 ची शिक्षिका श्रीम. रूपाली गाजुला यांच्या मार्गदर्शन विद्याथ्यानी सुंदर अशी एरोबिक्स ड्रिल सादर केली आणि शालेय संकुलात संचलन , लेझिम ,ड्रिल,समुहगीत,झंडागीत,भाषण जसे विविध कार्यक्रम मुलानी सादर केले .
शाळेचे मुख्याध्यापक, कार्यक्रमाचे अध्यक्ष व इमारत प्रमुख श्री भिकन देवरे यांनी विद्यार्थ्यांना या निमित्ताने व्यसनमुक्ति या विषयावर मार्गदर्शन केला. संपूर्ण कार्यक्रमात सर्व शालेय कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. तसेच शारीरिक शिक्षाकाच्या मोलाचे सहाकार्य आणि मागदर्शनामुले प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post