मोवाड येथे समता शिक्षण महाविद्यालयात ७४ वा प्रजासत्ताक दिन जल्लोषात





राजेंद्र बागडे नागपूर विभागीय प्रतिनिधी

भारत देशाला प्रजासत्ताक होऊन २६ जानेवारी ला ७४ वर्षे पूर्ण झाले .प्रजेच्या हाती सत्ता मन्हजे प्रजासत्ताक होय. हा प्रजासत्ताक दिन मोवाड येथील समता शिक्षण महाविद्यालयात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. सर्व प्रथम मान्यवरानी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीराव फुले, स्वातंत्र्यवीर महात्मा गांधी, भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोचे पुजन करून माल्यार्पण केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ रमेश ढोरे, प्रमुख उपस्थिती माजी आरोग्य अधिकारी डॉ संजय सोळंकी, यांच्या हस्ते ध्वजारोहण सकाळी ८:३० वाजता झाले उपस्थित माजी नगराध्यक्ष रंजना सोळंकी, प्रा. बाबाराव ठाकरे, प्रा.मोहन लांजेवार, प्रा प्रिती गुर्जर, शिक्षकेतर कर्मचारी कुष्ण आंजनकर, अशोक काकडे, पत्रकार श्रीकांत मालधुरे याची उपस्थित होती. यावेळी मान्यवरानी प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भाषणे दिली विद्यार्थीनी सामुहिक स्वागत गित सादर करून भाषणे दिली.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा बाबाराव ठाकरे यांनी केले तर सुत्रसंचालन दिव्यानी घावडे व आभार मजूद हीने मानले अल्पोपहार देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व विद्यार्थीनी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post