मुलुंडमध्ये महापौर बालचित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न



प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई 
मुलुंड, दि. ९ : मुंबई महापालिका शिक्षण विभाग अंतर्गत जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त संपूर्ण मुंबईत महापौर बालचित्रकला स्पर्धांचे आयोजन विविध उद्यानांमध्ये करण्यात आले होते. सकाळी ८ ते ११ या कालावधीत पहिली ते दहावीच्या मुलांच्या चार गटात स्पर्धा घेण्यात आल्या.


मुलुंड 'टी' विभागाचे प्रशासकीय अधिकारी (शाळा) कैलासचंद्र आर्य, विभाग निरिक्षिका कांचन गोसावी, कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांनी स्पर्धांचे आयोजन व नियोजन उत्तमरीत्या केले होते. उत्तम नियोजनाबद्दल पालकांनी समाधान व्यक्त केले.


मुलुंड मधील सर्व उद्यानाचे व्यवस्थापन प्रमुख मारुती साबळे यांच्या मार्गदर्शनानुसार सरदार प्रतापसिंह उद्यान प्रमुख सुभेदार विश्वकर्मा, लाला तुळशिराम उद्यान प्रमुख सुनिता प्रजापती, सी. डी. देशमुख उद्यान प्रमुख विद्या ठोके व नगरबाह्य धामणगाव शाळा उद्यान प्रमुख रमेश अडगाळे यांनी प्रत्येकी दोन मुख्याध्यापक, प्रशिक्षक, स्पेशल शिक्षक, शिपाई, मनपा सुरक्षा रक्षक व बी. व्ही. जी. संस्थेचे सुरक्षा रक्षक व हाऊस किपींग कर्मचाऱ्यांच्या मदतीने स्पर्धांचे नियोजन व्यवस्थितरित्या केले होते.

जिल्हा प्रशिक्षण केंद्र - सर्व शिक्षा अभियानचे अधीक्षक नंदु घारे, पूर्व उपनगरच्या अधीक्षिका (शाळा) ज्योती बकाणे, किसन केंकरे व वैद्यकीय अधिकारी डॉ. शार्दुले यांनी स्पर्धा स्थळी भेट देऊन सहभागी स्पर्धकांना प्रोत्साहित केले.

Post a Comment

Previous Post Next Post