कोजबी येथे पिण्याच्या पाण्याकरिता दोन दिवसापासून मचला हाहाकार.......... ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष........... ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज.....



दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी ७८२२०८२२१६


आरमोरी:- 
  तालुक्यापासून वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या कोजबी येथील पाणीपुरवठा नळाची पाईपलाईन फुटले असल्याने पिण्याचे पाण्याकरीता जनतेमध्ये हा हा मचल्याचे दिसून येत आहे या प्रकरणाकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे दोन ते तीन दिवसापासून नळाची मुख्य पाईपलाईन फुटली असल्याने कोसबी येथील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद आहे यामुळे जनतेला याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे नळाची पाईपलाईन ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दुरुस्ती करून आणि या जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता लक्ष देऊन जनतेला पिण्याचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी येथील ग्रामस्थांनी प्रसिद्धी पत्रकातून ग्रामपंचायत प्रशासनाकडे केली आहे आणि लोहरा येथील मुख्य मार्गालगत चौकातील 
बोरवेल दुरुस्ती करून त्या ठिकाणी पाण्याची समस्या पूर्ववत करावी अशी सुद्धा मागणी लोहारा वासियानी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post