वृद्धाचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल आरोपी पिता-पुत्र फरार



गडचिरोली, :-  शेत नुकसानीच्या जमा झालेल्या पैशांची मागणी केल्याबद्दल वृद्धाला बेदम मारहाण करण्यात आली. उपचाराअंती सदर वृद्ध घरी आल्यानंतर रक्ताच्या उलट्या होऊन त्याचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी तालुक्यातील येवली येथे घडली. याप्रकरणी वृद्धाला मारहाण करणाऱ्या पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही फरार असल्याची माहिती आहे. विलास केशव भांडेकर (50) रा. येवली असे मृत वृद्धाचे नाव असून त्र्यंबक भांडेकर आणि त्याचा मुलगा नितीन वसंत भांडेकर असे आरोपींची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार मृत सि भांडेकर यांना एकूण 6 भाऊ आहेत. दरम्यान त्र्यंबक भांडेकर यांच्या बॅक खात्यात शेत नुकसानीच्या मदतीची रक्कम जमा करण्यात आली होती. या रक्कमेतील आपला हिस्सा मृतक विलास भांडेकर यांनी त्र्यंबक भांडेकर यांना मागितला होता. मात्र यावर त्र्यंबकचा मुलगा वसंत भांडेकर व नातू नितीन भांडेकर यांनी विलास भांडेकर याला 31 डिसेंबर रोजी बेदम मारहाण केली होती. गंभीर अवस्थेतील विलास भांडेकर यांचे नागपूर येथे उपचार करण्यात आला. उपचारअंती ते 9 जानेवारी रोजी घरी परतले होते. दरम्यान शुक्रवारी विलास यांना रक्ताच्या उलट्या होऊन त्यांचा मृत्यू झाला.

Post a Comment

Previous Post Next Post