पेट्रोल पंपावर अशी करतात लुटमार....

चिमुर : - चिमूर तालुक्यातील मौजा शंकरपुर येथे आज दि.20/01/2023 ला सोमेश्वर पेट्रोल पंम्पा वर दोन चाकी वाहन पेट्रोल भरण्यासाठी गेले असता त्या दुचाकी च्या टँक मध्ये 180 रू.चा पेट्रोल ग्राहकाने टाकायला सांगितले.परंतु ग्राहकाला शंका आल्याने त्यांनी गाडीची टँक हालऊन बघीतली असता टँक मध्ये पेट्रोल आलाच नाही असे समजले.सदर या संदर्भाची माहिती पेट्रोल पंम्पा वरील कर्मचारी,मॅनेजर व मालकाला ही घटना लक्षात आणून दिली.काही वेळ मालक व कर्मचारी वर्ग हि घटना मान्यच करीत नसल्याने काही काळ तनावाचा वातावरन निर्माण झाला. पण ही गोष्ट मालकाच्या लक्षात आल्याने सर्व बाबी CCTV मार्फत तपासुन बगील्या नंतर CCTV कॅमेरा द्वारे गाडी मध्ये कधी पेट्रोल टाकण्यात आला.पेट्रोल गाडीच्या टँक मध्ये टाकले की नाही,पेट्रोल पंम्पाच्या मिटर ची रिडींग व गाडी ची टँक ची सुध्दा पाहणी करण्यात आली.

या मध्ये ग्राहकाची सत्य बाजु असल्याचे दिसुन आले.CCTV द्वारे असे कळाले कि ग्राहका कडून पैसे घेण्यात आले, पंम्पा वरील रिडींग सुध्दा दाखवण्यात आली. पण गाडीच्या टँक मध्ये पेट्रोलच आला नाही,हे शिध्द झाले.ग्राहकाने टँक मध्ये पेट्रोल का आला नाही ? कर्मचाऱ्याला प्रश्न विचारले असता येअर पकडला असेल अश्या प्रकारे कर्मचाऱ्या कडून ग्राहकास उत्तर देण्यात आले.असे असता पेट्रोल पंम्पा मध्ये सेटिंग असल्याची शंका निर्माण झाली.ग्राहका कडील काही व्यक्ती पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात यावी अशी चर्चा करीत चर्चा रंगायला लागली असताना पेट्रोल पंम्प मालकानी लगेच 180 रू. चे पेट्रोल दुचाकी च्या टँक मध्ये टाकून दिले गाडी मालकाला शांत करण्यात आले.अश्या प्रकारचे प्रकण या अगोदर सुध्दा झाल्याची चर्चा पेट्रोल पंम्पावर ऐकायला मिळाली.पेट्रोल भरणाऱ्या ग्राहकांची अशा प्रकारे लूट होत होती.या पेट्रोल पंम्पाची पेट्रोलियम कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्या कडूण तसेच तहसीलदार यांनी चौकसी करण्यात यावी अशी नियमित पेट्रोल भरणाऱ्या ग्रहाकडून मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post