शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहीम... शोध मोहिमेत शाळाबाह्य आढळलेल्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देणार...



अश्विन बोदेले
प्रतिनिधी
 सुपरफास्ट बातमी

आरमोरी :- एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शाळेत प्रवेशच न घेतलेल्या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी शिक्षण विभागाने पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी केंद्रप्रमुख राजेश वडपल्लीवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैरागड येथे शाळा बाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबविण्यात आली.
यात शाळाबाह्य आढळलेल्या दोन विद्यार्थ्यांना शाळेत दाखल केले जाणार आहे.
ही शोध मोहीम राबविण्यात येत असताना वैरागड च्या आठवडी बाजारात स्थलांतरित पाच कुटुंब आढळून आली. चंद्रपूर जिल्ह्यातील वलनी येथील ही पाच कुटुंब व्यवसाय करण्याकरिता आली होती.
 त्यामधील तेरा वर्षे वयोगटातील विद्यार्थिनीला वैरागड येथील कै. विठुजी मडावी विद्यालयात, तर नऊ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळा वैरागड येथे दाखल करण्याचे ठरले.  
या कामासाठी कै. विठूजी मडावी विद्यालयाचे कर्मचारी ए. एस. वाघरे, आर. आर .बनसोड, व्ही. डब्ल्यू .कुमरे , आर. एल. लाडे , एम . के. फुकटे , एन . के. बोरकुटे , एस. जे. मानकर यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post