बसले रे बसले चंद्रपूरला बसले भूकंपाचे धक्के...


चंद्रपूर वासियांच्या मनातून भूकंपाचे सावट दूर व्हायच्या आता सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा धरणीकंप सदृश्य धक्के जाणवल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असुन हा नेमका भूकंप आहे? वेकोलीच्या भुसुरंग स्फोटाने बसलेला हादरा आहे की अन्य काही ह्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्याने शहरवासीयांच्या मनात थरथराट निर्माण झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार आज दिनांक16 जानेवारीला रोजी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास शहरातील लालपेठ परिसरात अचानक जमिनीला हादरे बसू लागल्याने नागरिकांत हलकल्लोळ माजला. आदल्या दिवशी बाबूपेठ भागात घडलेल्या कंपनीची अनुभूती आज लालपेठ भागातील लोकांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच शहरात चींतायुक्त चर्चांना उधाण आले असुन सर्वत्र भितीसह कुतुलाहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिनांक 15 जानेवारीच्या घटनेची दखल घेत पालकमंत्री मुनगंटीवार यांनी नेमकं काय घडलं? व हे हादरे कशामुळे जाणवत आहेत ह्याबाबत शास्त्रीय माहिती सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते त्यातच आजच्या घटनेने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना लवकरच घटनेचे शास्त्रीय विश्लेषण करून ह्या घटनेमागील सत्य कळेल असा विश्वास जिल्हा प्रशासनाने दिला असुन कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.


दुसरीकडे यासंदर्भात प्रसिद्ध पर्यावरण तज्ज्ञ तसेच भूगर्भ अभ्यासक सुरेश चोपणे ह्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला असून वेकोलीच्या बंद खाणी बुजवतना नियमांचे पालन केल्या गेले नसल्याचा संशय व्यक्त केला असुन ह्या खाणी बुजवताना खाणीत योग्य प्रमाणात रेती भरण्यात आली नसल्याने खाणीतील साचलेले पाणी खोल भगर्भात शिरून भूस्तर खचून असे भूकंप सदृश्य धक्के येतात ह्याला,Hydro sysmology म्हणतात असे सांगितले असुन ह्याशिवाय घुग्गुस येथे काही महिन्यांपूर्वी घडलेली घटना अशाच कारणांमुळे झाली असल्याची शक्यता वर्तविली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post