जे लोक बलात्कार करतात त्यांना लोक ठार का मारत नाहीत ? घरावर बुलडोझर फिरविला जातो तस बलात्कारी लोकांना ठार का मारत नाहीत ... ?




बांदामध्ये अनु.जातीच्या महिलेवर सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील देहत 
कोतवालीमधील गुरेह गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा तीन तरुणांनी एका अनु.जातीच्या महिलेवर बलात्कार केला.
उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातील देहत कोतवालीमधील गुरेह गावाजवळ शनिवारी रात्री उशिरा तीन तरुणांनी एका अनु.जातीच्या महिलेवर बलात्कार केला.




याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी महिलेला पोलिस ठाण्यात नेलं, तिथं तिची चौकशी करण्यात आली. सामूहिक बलात्काराची ही घटना ऐकून पोलिसही चक्रावले. पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, ती पतीसोबत दुचाकीवरून सासरच्या घरी जात होती. 



गुरेह गावाजवळ पतीच्या तीन मित्रांनी त्यांना रस्त्यात अडवलं. यावेळी पती दारूच्या नशेत होता, त्याचा फायदा घेत त्यांच्या मित्रांनी पतीला दुकानातून सिगारेट घेण्यासाठी पाठवलं. यानंतर दोघांनी तिच्यावर बलात्कार केला, तर तिसर्‍यानं विरोध केल्यामुळं बलात्कार करण्यात अयशस्वी झाल्यानंतर प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बाटली घातली. रात्री उशिरा गँगरेपची बातमी मिळताच, सीओ सिटी अंबुजा त्रिवेदी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पीडितेची विचारपूस केली.



कोतवालीचे प्रभारी अखिलेश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला तिच्या आईनं गावातील दोन तरुणांसह बाईकवरून तिच्या सासरच्या घरी पाठवलं आणि त्यांनी तिच्याशी गैरवर्तन केलं. घटनेची सत्यता जाणून घेण्यासाठी पोलिसांनी रात्री उशिरा घटनास्थळ गाठलं. महिला आणि तिच्या आईच्या जबानीत तफावत असल्यामुळं पोलीस घटनेची सत्यता जाणून घेण्यात व्यस्त आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post