हिन्दु ज्ञान मंदिर, ब्रम्हपुरी येथे स्कॉऊट-गाईड विभागा तर्फे 'खरी कमाई

हिन्दु ज्ञान मंदिर, ब्रम्हपुरी येथे स्कॉऊट-गाईड विभागा तर्फे 'खरी कमाई


हिन्दु ज्ञान मंदिर ब्रम्हपुरी येथे स्कॉऊट-गाईड विभागा तर्फे विद्यालयाच्या प्रांगणात 'खरी कमाई' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले उद्घाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सैय्यद मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ शिक्षिका श्रीरामे मॅडम पर्यवेक्षिका गाईड शिक्षिका सौ. काळे मॅडम, स्कॉऊट शिक्षक श्री. धाकडे सर, श्री. सांगोळकर सर, गाईड शिक्षिका सौ. मस्के मॅडम, सौ.सातपूते मॅडम आणि शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.


यावेळी स्कॉऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाद्य पदार्थाचे स्टॉल्स लावून खरी कमाई कशी करायची याचे धडे घेतले. विद्यार्थ्याच्या जीवनात श्रमाचे महत्व पटवून देताच स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय उभारून उदारनिर्वाह करण्याची प्रेरणा मिळते.

शाळेतील 8 वी, 9 वी, 10 वीच्या स्कॉऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी स्टॉल लावले होते. कार्यक्रमा दरम्यान मुख्याध्यापिका सैय्यद मॅडम यांनी स्टॉलचे निरक्षिण करून पदार्थाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परीश्रम घेतले.


Post a Comment

Previous Post Next Post