मुख्याधिकारी,न.प. गडचिरोली यांचा महाप्रताप


विद्यमान न्यायालयाच्या मनाई हूकूमाला न जूमानता खाजगी जागेत रस्ते बनवून गरिब शेतक-यांच्या शेतीवर अतिक्रमण।
गडचिरोली:- मौजा देवापुर रिठ येथील भूमापन क्रमांक ९५ ,
भो. व. १ , क्षेत्र ०.९५ हे.आर. ही शेतजमीन अशोक विठ्ठल मोगरे व इतर शेतक-यांची सामायिक मालकीची आहे। सदर शेतजमीनीवर सूखदेव बावणे व इतरांनी अतिक्रमण करुन झोपड्या बनविण्याचा प्रयत्न केला असता शेतक-यांनी अटकाव करुन सदर शेतीची भूमी अभिलेख कार्यालय गडचिरोली मार्फत मोजनी करुन मा. कोर्टात दावा दाखल केला। अशोक विरुद्ध सूखदेव बावणे रे.दि.मु.क्र.२५/२०२२ दाखल असून मा.न्यायालयाने सदर प्रकरणात मनाई हूकूम दिलेला आहे।



नगर परिषदेवर अधिपत्य असलेल्या राजकीय नेत्यांच्या दबावात येवून मुख्याधिकारी,न.प.गडचिरोली यांनी कोर्ट वि. दिवानी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर,गडचिरोली यांच्या मनाई हूकूमाला न जूमानता नगर परिषदेची जे सी बी चा वापर करुन रस्ता काढण्याचा प्रयत्न केला। शेतकरी अशोक मोगरे यांनी मुख्याधिका-याची भेंट घेवून कोर्टाचे मनाई हूकूम दाखविले व काम थांबविण्याची विनंती केली।मूख्याधिकारी, गढ़चिरौली यांनी काही दिवसाकरिता काम थांबविले मात्र दोन दिवसापुर्वी रस्ते बनविण्याचा एकच सपाटा सूरु केला असून विज पुरवठा करण्यासाठी विद्यूत खांब सूध्दा शेतक-यांच्या जागेत टाकलेले आहेत। इतक्यावरच न थांबता अतिक्रमण धारकांच्या झोपड्यांचे घरटैक्स आकारणी करुन हूकूमशाही चा कळस गाठला आहे।
न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना करने गंभीर अपराध असल्याची जाणीव असतांना सूध्दा केवळ बलाढ्य राजकारण्यांकडून पाट थोपाटून घेण्याचा मोह सद्या मूख्याधिकारी गढ़चिरौली यांना आवरता आलेला नाही।

शेतक-यांची मागणी- १)येत्या दोन दिवसात भू.क्र. ९५ मधिल रस्ते मोडून पुर्ववत शेतीयोग्य जमीन करावी।
२) विज पुरवठा करण्यासाठी दिलेली मंजूरी यथाशीघ्र रद्द करावी।
३) अतिक्रमण धारकांच्या झोपड्यांचे घरटैक्स रद्द करावे । अन्यथा मुख्याधिकारी,नगर परिषद,गडचिरोली विरुद्ध
न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल असा इशारा शेतक-यांनी दिला आहे।

Post a Comment

Previous Post Next Post