रस्ता वाहतुकीच्या नियमांची माहिती असेल तर अपघातांचे प्रमाण कमी होईल - कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर


मुलुंड व भांडुपमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह संपन्न 


प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, मुंबई 
मुलुंड, दि. १५ : मुलुंड व भांडुप विभागाचे कनिष्ठ पर्यवेक्षक शिवदत्त कोठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड व भांडुप मधील सर्व शाळांमध्ये रस्ता सुरक्षा दल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाच्या निमित्ताने मुलांना सिग्नलची माहिती देण्यात आली. चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. रस्ता वाहतुक सुरक्षा संदर्भात मुलांनी विविध घोषवाक्ये तयार केली.


आर. एस. पी. च्या शिक्षकांनी घड्याळी तासिकेत मुलांना रस्ता सुरक्षा बाबत नियमांची माहिती सांगितली. सिग्नल, झेब्रा क्रॉसिंग बाबत माहिती दिली. रस्ता वाहतुकीसंदर्भात विविध घोषवाक्ये तयार करण्यात आली. रस्ता सुरक्षा या विषयावर सर्व शाळा संकुलात चित्रकला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांना मुलांनी उत्तम प्रतिसाद देऊन सुंदर चित्रे रेखाटली. 

मुलुंड व भांडुप विभागातील कार्यरत शारीरिक शिक्षण शिक्षक भालचंद्र यादव, दिलीप अहिनवे, अनुजा दळवी, मीना महाडिक, अपर्णा बागुल, बळीराम राठोड, देविदास पाटील, दिनकर फेगडे, नरहरी कोकरे, यशोधरा पोळ, यशवंत चव्हाण, गंगाधर गज्जलवार, प्रशांत देऊळकर, शर्मिला पवार, ललित जाधव, तनुजा शिरोडकर, सविता पाटील, अनिल पाटील व दिपक आंब्रे यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post