मुंबई महापालिकेचे विद्यार्थी आता क्रिकेटमध्ये चमकणार - शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ




बांद्रा विजेता तर कुर्ला विभाग उपविजेता

प्रतिनिधी : दिलीप अहिनवे, 
मुंबई, दि. १३ : मुंबई महापालिका शिक्षण विभाग व शारीरिक शिक्षण उपविभागाने यावर्षी मुलांचा क्रिकेट मधील उत्साह बघुन क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले होते. माटुंगा स्थित पारशी झोराष्ट्रीयन मैदान (मेजर दडकर) येथे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धांमध्ये शा. शि. वि. क्र. ६ (बांद्रा) यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले तर शा. शि. वि. क्र. १२ (कुर्ला) यांनी उपविजेतेपदावर समाधान मानले. 



मुंबई महापालिका उपायुक्त (शिक्षण) केशव उबाळे, शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी (माध्य.) राजू तडवी, वरिष्ठ पर्यवेक्षक राजेश गाडगे व प्राचार्य रवींद्र परदेशी यांनी गरीब मुलांना दर्जेदार मैदान व संधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे. आता महापालिका शाळांमधील विद्यार्थी भारतीय संघात दिसले तर आश्चर्य वाटणार नाही. पालिका शाळांमधील मुलांमध्ये खुप क्षमता आहे. ते अशक्य ते शक्य करुन दाखवतील यात तीळमात्र शंका नाही असे प्रतिपादन महापालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post