पेरमिली येथील सरकारी धान खरेदी केंद्रामध्ये शेतकऱ्यांचा मानसिक त्रास..



अहेरी तालुक्यात येणारा पेरमिली येथील सरकारी दान खरेदी केंद्र मध्ये - पेरमिली क्षेत्रातील गरीब आदिवासी शेतकऱ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
पेरमिली क्षेत्रातील सर्व त्रासदायक शेतकऱ्यांचा म्हणणे असे आहे की, पेरमिली येथील सरकारी धान खरेदी केंद्र मध्ये - शेतकऱ्यांचे धान हे खरेदी केंद्रत नेवून ५ ते ७ दिवस मुक्कामी असुन सुद्धा गरीब आदिवासी शेतकऱ्यांचे धानाची खरेदी होत नाही.
त्यामुळे ५ ते ७ दिवसापासून धान खरेदी केंद्रत मुक्कामी असलेले सर्व गरीब आदिवासी शेतकऱ्यांचा मानसिक त्रास होत असतो.
तसेच त्रासदायक शेतकऱ्यांचा म्हण्यानुसर काही व्यापारी लोक पेरमिली क्षेत्रातील अशिक्षित आदिवासी शेतकऱ्यांचा फायदा घेऊन, अशिक्षित शेतकऱ्यांचा ७/१२ चा नावाने आपले शेकडो क्विंटल धान खरेदी केंद्रत नेवून धान विकत आहेत.
परंतु दुसरीकडे मात्र खरा शेतकरी असलेला व्यक्ती ५ ते ७ दिवस मुक्कामी राहुन सुध्दा त्यांचे धानाची काटा होत नाही ( धानाची खरेदी होत नाही ).
तसेच पेरमिली मधील धान खरेदी केंद्रातील कर्मचारी कडून सुध्दा शेतकऱ्यांना चांगला प्रतिसाद मिळत नाही. आणि सर्व शेतकऱ्याकडून हमाली चा नावाने प्रती क्विंटल प्रमाणे पैसाची वसुली होत असतो.
म्हणुन पेरमिली क्षेत्रातील गरीब आदिवासी शेतकऱ्यांचा म्हणणे आहे की, गडचिरोली जिल्हा प्रशासन आणि सबंधित विभागाने लक्ष देऊन, पेरमिली येथील सरकारी धान खरेदी केंद्राची चौकशी करून,
पेरमिली क्षेत्रातील गरीब आदिवासी शेतकऱ्यांचा धानाची खरेदी लवकरात लवकर करण्यात यावी.

Post a Comment

Previous Post Next Post