सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रत्येक भाषेत उपलब्ध होणार


सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण
सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रत्येक भाषेत उपलब्ध होणार आहे व खेड्यापाड्यात राहणार्‍या लोकांना त्यांच्या भाषेत न्यायालयाचे निर्णयांची सर्व माहिती समजेल असे सरन्यायाधीश सर्वोच्च धनंजय चंद्रचूड यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

चंद्रचूड म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांच्या सर्व प्रती लवकरच हिंदी तसेच देशातील इतर घटक राज्यांतील भाषांमध्ये उपलब्ध होतील, जेणेकरून देशातील खेड्यापाड्यात राहणार्‍या लोकांना त्यांच्या भाषेत निर्णयांची माहिती सहज मिळू शकेल. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) भाषांतराचा वापर करण्याचे संकेत दिले. ही व्यवस्था लोकांसाठी बनवली आहे. न्यायालयीन कामकाजाचे थेट प्रक्षेपण होणार आहे. जेव्हा तुम्ही कोणत्याही विषयावर थेट चर्चा करता तेव्हा तुम्हाला कळते की आपल्या समाजात किती अन्याय आहे.

Post a Comment

Previous Post Next Post