पत्नीवरील संशयावरून पत्नीला मारहाण करून आणि जमिनीवर आपटून घेतला चिमुकल्याचा बळी



#nagpur #nagpurcity #NagpurPolice #CrimeNews #husbandwife #suspicion #satarkpolicetimes

नागपूर - पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत निर्दयी बापानं जमिनीवर आपटलेल्या चिमुकल्याचा अकरा दिवसाच्या उपचारानंतर मृत्यू झाला आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयत चिमुकल्यावर उपचार सुरू होते. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मारहाण करत गिरीश गोंडाणे या व्यक्तीनं जन्मलेल्या चिमुकल्याला फरशीवर आपटलं. या क्रूर कृत्यामुळं बाळाला गंभीर इजा झाली असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात एनआयसीयुमध्ये उपचार सुरू होते. अखेरीस काल अकरा दिवसांच्या उपचारानंतर बाळाचा मृत्यू झाला. गिरीश गोंडाणे असं निर्दयी बापाचं नाव असून तो अमरावती जिल्ह्यातील सावर्डीचा रहिवाशी आहे. नागपूर पोलिसांनी या अगोदर गिरीश विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती. आता त्याच्या विरोधात हत्येचे प्रकरण दाखल करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post