सावधान..! Google वर 'या' गोष्टी कधीही सर्च करू नका, नाहीतर सरळ जाल जेलमध्ये...



💁🏻‍♂️ अशा काही गोष्टी आहे कदाचित ज्या तुम्ही गुगलवर सर्च केल्यास तुम्हाला ते महागात पडू शकते. म्हणजेच तुम्हाला तुरुंगातही जावे लागू शकते. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की, अशा कोणत्या गोष्टी गुगलवर सर्च करणे टाळावे.

💣 *बॉम्ब कसा बनवावा?*

अगदी गम्मत म्हणूनही कधी गुगलवर बॉम्ब कसा बनवायचा? हे सर्च करू नका. असे केल्यास तुम्ही सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर येऊ शकता. तुम्ही गुगलवर असा सर्च केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुम्ही अडचणीत येऊ शकता.

❌ *बाल अश्लील कंटेंट-* 

जर तुम्ही गुगलवर चाइल्ड पोर्नोग्राफीशी संबंधित गोष्टी सर्च केल्या तर तुमचा आयपी पत्ता ओळखून तुम्हाला तुरुंगातही टाकले जाऊ शकते. चाइल्ड पॉर्न बनवणे किंवा ते डाउनलोड करून पाहणे हे दोन्ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्या संबंधित गोष्टी अजिबात गुगलवर सर्च करू नका. हा खूप संवेदनशील विषय असल्याने त्याबाबत पोलीस तुम्हाला तुरुंगात टाकू शकतात. 

🧐 *कोणताही गुन्हा करण्याविषयी शोध-* 

कोणताही गुन्हा करण्याविषयी शोध लोकांसाठी गंभीर समस्या निर्माण करू शकतो. कारण कोणीतरी गुन्हा करण्याची योजना आखत असेल तर सुरक्षा यंत्रणांना त्याची माहिती मिळेल व त्यामुळे तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकेल. म्हणजेच, एखाद्याचा खून कसा करायचा?, विष कसे बनवायचे? किंवा संशय न येता गुन्हा कसा करायचा? इत्यादी सर्चमुळे पोलीस तुमच्या दारात येतील. विशेषत: खून, अपहरण, ड्रग्ज किंवा तस्करी संबंधित विषयांबाबत वारंवार सर्च केल्यास तुमच्यासाठी नक्कीच गंभीर संकट उभे राहील. 


🤰🏻 *गर्भपात बद्दल-* 

गर्भपात कसा करायचा? हे तुम्ही कधीही गुगलवर सर्च करू नये. बरेच लोक इथे 'How to abort' असे सर्च करतात, पण त्यामुळे तुमच्यासाठी मोठी समस्या उभी राहू शकते. गुन्ह्याव्यतिरिक्त जे काही संवेदनशील विषय आहेत, ज्यांचा ऑनलाइन शोध घेणे टाळावे, त्यात गर्भपात ही महत्वाची बाब आहे. कारण भारतात गर्भपाताबद्दल कठोर वैद्यकीय मार्गदर्शक तत्त्वे आहेत आणि रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी हे केवळ नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकानेच केले पाहिजे. त्यामुळे याबाबत कोणतीही समस्या उद्भवल्यास गुगलवर सर्च करण्याऐवजी ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे चांगले.


Post a Comment

Previous Post Next Post