भाऊ तिकडे बकरे दिसले का ? 4 बकरे गेले चोरीस



तळोदी (बा) : तळोधी बाळापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या नवानगर तळोधी बा. येथील मायाबाई सोमेश्वर बोरकर वय ६२ यांच्या घरून दोन बकऱ्या व दोन बोकड चोरी झाल्याची घटना दि. १७ फेब्रुवारी २०२३ रोज सकाळी सहा वाजता उघडकीस आली.

१६ फेब्रुवारी २०२३ रोजी मायाबाई बोरकर हे सकाळी दहा वाजता चे सुमारास गावातील बैल ढोर व बकऱ्या राखण्यासाठी गेली होती सायंकाळी सहा वाजता बकऱ्या व बैल ढोर आणून घरी परत आली. माया बोरकर यांच्या घरी दोन बकरे आणि दोन

शेळ्या असे गोट्यात बांधून ठेवली होती. दि. १७ फेब्रुवारी २०२३ ला सकाळी सहा वाजता उठून बघतात तर कोठ्यात बांधून ठेवलेल्या दोन बकऱ्यापैकी एक जांभळ्या रंगाच्या तर दुसऱ्या काल्या रंगाच्या असे दहा हजार रुपयांचे बोकड आणि २ नग बकरी नऊ हजार रुपयाच्या असे एकोणवीस हजार रुपये किंमतीच्या ४ नग जनावर अज्ञात चोरांनी चोरले.

त्यामुळे एकोणवीस हजाराची आर्थिक नुकसान झाल्याची माहिती पोलीस स्टेशन येथे दिली. पुढील तपास तळोधी पोलीस करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post