कृषी पंपांना पुन्हा नियमीत बारा तास वीज पुरवठा ला मुदत वाढ दया



प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी संदीप कोरेत  यांची उपमुखमंत्री तथा पालकमंत्र्यांकडे मागणी

     अहेरी :-  खरीप पिक म्हणून सिरोंचा तालुक्यात मिरची व भात पिकाच्या उत्पादनाकरीता मागील दोन महिने शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन सकाळी सहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत शेतीच्या  पंपाकरिता विद्युत पुरवठा नियमित केला होता.त्यामुळे शेतकरी राजा अतिशय आनंदित झाला आणि शेतामध्ये आपला जीव ओतून राबू लागला,कौटुंबिक सुखी जीवनाचे चित्र रंगवू लागला.
          मात्र त्याचा आनंद अल्पकाळ टिकला कारण रब्बी हंगामा करिता देखील मिरची व भात उत्पादक शेतकऱ्यांची 
 भात पिकांची पऱ्हे टाकून झालेले आहेत. भात पिकाचे पूर्ण उत्पादन येण्याकरता किमान दोन महिन्याचा कालावधी निश्चितच हवा असतो.फेब्रुवारी आणि मार्च व एप्रिल हे तिन महिने उन्हाळी भात  मिरची पिकाकरिता अत्यावश्यक असतात. या कालावधीत मिरची व भात पिकांना पाण्याचा तुटवडा गेल्यास पीक होणार नाही आणि शेतकरी हवालदिल होईल.
    फेब्रुवारी आणि मार्च व एप्रिल या तिन महिन्याकरिता मागच्या शासन निर्णयानुसार विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी मिरची व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने प्रदेश सदस्य आदिवासी आघाडी महाराष्ट्र राज्य भाजपा संदीप कोरेत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच वने व सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री मा. नाम.सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे कडे अप्पर जिल्हाधिकारी यांच्या कडे निवेदना मार्फत केलेली आहे त्यावेळी निवेदन देताना मयूर पिपरे, सुधीर कोरेत, तिकेश राऊत व ईतर कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post