अखेर फव्वारा चौकातिल अतिक्रमण काढले


 देसाईगंज : शहराच्या फव्वारा चौकातिल अतिक्रमण काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपिठाने दिल्यानंतर आज प्रशासकिय यंञनेमार्फत देसाईगंज शहरातिल फव्वारा चौकातिल अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली सविस्तर वृत्त असे की देसाईगंज च्या फव्वारा चौकात स्वातंञ्य संग्राम सेनानी चतुर्भुज जोशी यांना शासनाकडुन जागा बहाल करण्यात आली

 माञ अनेक वर्षापासुन लहान व्यवसाईकांनी आपले दुकान ठाटुन आपले उदर निर्वाह चे साधन सुरु केले होते माञ चतुर्भुज जोशी यांचे वारस श्यामसुंदर जोशी यांनी कायदेशीर लढाई लढुन नागपुरच्या उच्च न्यायालयात धाव घेतली सर्व बाबी पडताळुन नागपुर उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने फव्वारा चौकातिल सर्व अतिक्रमण काढुन टाका असे आदेश दिल्या नंतर आज प्रशासकिय अधिकार्यांनी फव्वारा चोैकात आपल्या चमुसह दाखल झाले व जेसिपी च्या सहाय्याने अतिक्रमन काढण्यास सुरुवात केली या प्रसंगी देसाईगंज चे तहसिलदार संतोष महाले पोलिस निरिक्षक महेश मेश्राम मुख्य अधिकारी डॉ कुलभुषन रामटेके पो उप निरिक्षक ज्ञानेश्वर लांडे युनुस ईनामदार सोनम नाईक नायब तहसिलदार राम नैताम अविनाश पिसाळ नगर परिषदेचे इंजि साई कोंडलेकर महेश गेडाम इंजि गेडाम यांचेसह कर्मचारी महसुल विभागाचे पोलिस विभागाचे कर्मचारी उपस्थित होते .

Post a Comment

Previous Post Next Post