अन् पोलीस अधिकाऱ्याने संडासचा दरवाजा काढून नेला

चंद्रपूर : एका पोलीस कर्मचाऱ्यांनी केलेल्या कारन्यामाची भलतीच चर्चा


चंद्रपुरात सुरू आहे. (Police Officer Transfer) दोन वर्ष कर्तव्य बजावलेल स्थळ सोडताना या कर्मचाऱ्यांन (AC took away the toilet door along with other items) एसी इतर वस्तू सोबत टॉयलेटच्या दरवाजाही सोबत नेला. अनेक शासकीय कर्मचारी सहकाऱ्यांना, गावकऱ्यांना काहींना काही भेटवस्तू देऊन जातात. मात्र या अधिकाऱ्यान केलेली कामगिरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. विशेष म्हणजे आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर अनेक गुन्हेगारांना घाम सोडला होता.


चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील (Chandrapur Local Crime Branch) एक नाव अस होत की जे नाव ऐकताच गुन्हेगारांना धडकी भरायची. अतिशय गुंतागुंतीचे असलेल्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा या अधिकाऱ्यान केला होता. चंद्रपुरात अडीच वर्ष स्थानिक गुन्हे शाखेत काढलं. आता त्यांची बदली मानव संसादन विभाग येथे झाली आहे. अडीच वर्षात या अधिकाऱ्यांन स्वतःचा सोयी सुविधांसाठी काही वस्तू खरेदी केल्या होत्या. बदली झाल्यानंतर या अधिकाऱ्यांन वस्तू सोबत नेल्याच, त्यासोबतच टॉयलेटला लावला दरवाजाही घेवून गेलेत. बहुतांश अधिकारी ज्या गावात कर्तव्य बजावतात त्या गावाला काहीतरी भेट वस्तू देऊन जातात. त्या गावाशी त्यांचे भावनिक ऋणानुबंध जोडले जातात. ज्यांनी आपल्यासाठी सहकार्य केलं, ज्या मातीत आपण काही वर्ष घालवलं त्या मातीला आपली ओळख असावी यासाठी काहीतरी मागे सोडून जातात. मात्र या अधिकाऱ्यान केलेली कामगिरी बघता सर्वांनीच तोंडावर बोट ठेवले आहे.

कासवाच बिराड पाठीवर...

चंद्रपूर येथे बदली व्हायचा आधी हा अधिकारी जिल्ह्यातील सावली या तालुका स्थळी पोलीस निरीक्षक पदावर कर्तव्य बजावलं होतं. इथून बदली झाल्यावर या अधिकाऱ्यांन खरेदी केलेल सर्व सामान सोबत नेलं होतं. काहीसा असाच प्रकार त्यावेळी घडला होता. आपलं जे जे आहे, ते ते सोडायचे नाही, काहीशी अशीच वृत्ती या अधिकाऱ्याची करायची आहे.

माझ्या कष्टाची कमाई मी नेली....

यासंदर्भात त्या अधिकाराशी भ्रमणध्वनीने संपर्क साधला असता, माझ्या कष्टाच्या कमाईने ज्या वस्तू घेतल्या त्या मी सोबत नेल्या आहेत. कुणाचा बाप दादाची वस्तू मी नेलेली नाही, असे ते म्हणाले....

Post a Comment

Previous Post Next Post