गोमणी गावा जवळील जलसंधारण विभागाच्या बंधारा बांधकामात अवैध रेती व वृक्षतोड.


गडचिरोली _ मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावा जवळील , कोळीगांव छोट्या नदिवर अतीदुर्गम भागात मृद व जलसंधारण विभाग ' गडचिरोली च्या सहकार्याने पाच करोड रुपयाच्या अनुदानातून पेशा कायदा अंर्तगत बंधार्‍याचे काम सुरु आहे . सदर कामात त्याच नाल्यातील अवैध रेती उपसा सुरु असुन नाल्याच्या अवती भोवती अवैध वृक्षतोड झालेली आहे . शासनाने नदि घाटाचा रेती बाबत कोणत्याच प्रकारचा लिलाव झाला नसतांना एवढ्या मोठ्या प्रमाणात रेती येतो कुठून याचा शोध मुलचेरा तहसिलदारांनी घ्यायची गरज आहे . सदर कामावर आघ्र चा ठेकेदार राजरोसपणे काम करीत आहे . परंतु पेशा अर्तगत कामाची पाहणी ग्रामसेवक ग्रामपंचायत गोमणी , अवैध वृक्षतोड वनपाल गोमणी व तलाठी साज्या गोमणी यांची देखरेख असतांना सुद्धा सदर कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे . गावकऱ्यांच्या तक्रारीवरून रिपब्लिकन पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्चर बोरकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता आघ्र च्या ठेकेदारास अवैध रेती उपसा बाबत विचारपुस केली असता त्यांनी उडवाउडवीची उतर दिले. सदर नाल्यातूनच रेतीचा उपसा सुरु असल्याचे प्रत्यक्ष दर्शी दिसत आहे .


 गोमणी वनविभागाच्या वनरक्षक धोंडा यांना सदर कामावरील अवैध वृक्षतोड बाबत फोनवरून विचारणा केली असता त्यांनीही उडवाउडवीची उतर दिले . तर ग्रामसेवक वेलादी ग्रामपंचायत गोमणी यांना फोन करून विचारले असता त्यांनीही टाळाटाळ केली . तलाटी साज्या गोमणी यांचा फोन बंद होता . सदर कामात अवैध रेतीमुळे शासनाचा करोडो रुपयाचा महसुल बुडण्याची दाट शक्यता आहे . तहसिलदार मुलचेरा व वनविभाग R Fo यांनी वेळीच लक्ष देण्याची गरज आहे . कोळीगांव नाला बंधारा बांधकामांमुळे फक्त जनावरांना पिण्याच्या पाण्याची सोय होवू शकते व वरील भागात थोडी शेती आहे . त्या शेतकर्‍याना सिंचनाची सोय होवू शकते मग् आजुबाजुला जंगलच आहे . 


यातही याच बंधार्‍याच्या वर दोनसे पाऊलवार यापूर्वीच बंधारा बांधला आहे . त्याच बंधाऱ्यांची अवस्था जिर्ण अवस्थेत असतांना मृद व जलसंधारण विभागाने पुन्हा त्याच ठिकाणी बंधारा बांधकाम करीत असल्याचे आश्यर्य वाटते. ग्रामसेवक. तलाटी व वनरक्षक यांनी सदर बंधा ऱ्याची वेळीच पाहणी करून अवैध रेती उपसा व वृक्षतोड याकडे लक्ष घ्यावे . नव्हे यांना सर्वकाही माहीत असुनही , तेरी भी चुप व मेरी भी चुप अश्या प्रकारचे काम मृद संधारण विभागाच्या आर्शीवादाने सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post