प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड केल्यास पाच वर्षे परीक्षा तर देता येणार नाहीच, शिवाय फौजदारी गुन्हाही दाखल होणार.


━━━━━━━━━━━━━
📣 दहावी आणि बारावी परीक्षेबाबत मंडळाकडून महत्वाची सूचना जारी करण्यात आली असून यंदा दहावी बारावीच्या परीक्षेचे नियम कडक करण्यात आले आहेत. परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, प्रश्नपत्रिका मिळविणे, विकणे आणि विकत घेतल्यास किंवा मोबाईल अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केल्यास परीक्षार्थी विद्यार्थ्याची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विद्यार्थ्यास पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे. शिवाय परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

👇🏻 *खालील नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणार कारवाई..*

◆ मंडळाच्या अधिकृत उत्तरपत्रिका, पुरवण्या, आलेख, नकाशे, लॉग टेबल, अनधिकृतपणे मिळवणे आणि वापर केल्यास पुढील एका परीक्षेस प्रतिबंध करण्यात येणार आहे
◆ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांची चोरी करणे, मिळविणे, विकणे व विकत घेणे तसेच भ्रमणध्वनी व अन्य इलेक्ट्रॉनिक्स माध्यमावर प्रसारित केली तर पुढील पाच परीक्षांना प्रतिबंध करण्यात येणार आहे
◆ परीक्षार्थ्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल होणार
◆ मंडळाने मान्यता न दिलेली अथवा प्रतिबंध केलेली साधने, साहित्य परीक्षा दालनात स्वत:जवळ बाळगणे वापरणे.
◆ उत्तरपत्रिकेत-पुरवणीत प्रक्षोभक,अर्वाच्य भाषेचा वापर, शिवीगाळ लिहिणे किंवा धमक्या देणे, बैठक क्रमांक,फोन नंबर ,भ्रमणध्वनी क्रमांक देऊन संपर्क साधण्यास विनंती करणे.
◆ विषयाशी संबधित नसलेला अन्य मजकूर लिहिणे
◆ परीक्षा सुरू असताना इतर परीक्षार्थ्यांबरोबर उत्तराच्या संदर्भात गैरहेतूने संपर्क साधणे,एकमेकांचे पाहून लिहिणे, अन्य परीक्षार्थ्यांस तोंडी उत्तरे सांगणे.

✍🏻 त्यामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा चुकीच्या मार्गाने परीक्षा देण्याचा प्रयत्न केल्यास पुढील पाच वर्ष परीक्षेसाठी मुकावे लागणार आहे.


Post a Comment

Previous Post Next Post