गडचिरोली: अपघाताच्या धक्क्याने गर्भातील सहा महिन्यांचे बाळ दगावले


गडचिरोली:- प्रत्येक गर्भवती महिला स्वत:सोबत पोटातील त्या गोळ्यालाही जीवापाड जपत असते. मात्र दुर्दैवाने गुरुवारी कोरची-कुरखेडा महामार्गावर झालेल्या अपघाताच्या धक्क्याने एका गर्भवतीला तिच्या पोटातील सहा महिन्यांच्या गर्भाला गमवावे लागले. या अपघातात घटनास्थळीच दोन जण दगावले होते. पोटातील गर्भाच्या रूपाने तिसराही जीव गेला आहे.

या अपघातात कोरची-कुरखेडा महामार्गावर प्रवासी घेऊन भरधाव वेगाने निघालेल्या क्रूझर या प्रवासी गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला चेंडूसारखे उडवल्यानंतर ती क्रूझर दोन कोलांट्या खाऊन लगतच्या शेतात जाऊन पडली. त्यामुळे दुचाकीस्वारासह क्रुझरमधील एका प्रवासी महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याशिवाय आठ प्रवासी जखमी झाले. त्या जखमींमध्ये सहा महिन्यांची गर्भवती असलेल्या अंजना रोशन मडावी (२६, रा. पड्यालजोब) या महिलेचाही समावेश होता. सर्व जखमींना कोरची पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर सदर गर्भवती महिलेसह इतर दोन जखमींना पुढील उपचारासाठी गडचिरोलीला हलविण्यात आले



Post a Comment

Previous Post Next Post