अंगणवाडी सेविकांच्या भरती संदर्भात महत्त्वाची माहिती :‘अशी’ राहील अंतिम निवड प्रक्रिया...*

💁🏻‍♀️ राज्यातील १ लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये ३२ हजार सेविका व मदतनीस पदांची भरती प्रक्रिया आता सुरु झाली आहे. पदोन्नतीनंतर ३१ मार्चपूर्वी सर्वच प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. आता भरतीसाठी महिला उमेदवार किमान बारावी उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. १८ ते ३५ वयोगटातील उमेदवारांना भरतीसाठी अर्ज करता येतील. विधवांसाठी ४० वयाची अट आहे. हि भरती प्रक्रिया अशी पार पडेल त्याबद्दल सविस्तर माहिती खाली वाचा…!

💯 *भरतीसाठी १०० गुणांचे समीकरण*
◆ इयत्ता बारावीमध्ये ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण असल्यास भरतीसाठी संबंधित महिलेला ६० गुण मिळतील.
◆ ७० ते ८० टक्क्यांसाठी ५५ गुण तर ६० ते ७० टक्क्यांपर्यंत ५० गुण आणि ५० ते ६० टक्क्यांसाठी ४५ गुण, तर ४० ते ५० टक्क्यांसाठी ४० गुण दिले जाणार आहेत.
◆ पदवीधर उमेदवारासाठी ८० टक्क्यांसाठी अतिरिक्त पाच गुण आणि त्यानंतर प्रत्येक दहा टक्क्यांसाठी (७० ते ८० टक्क्यांपर्यंत चार गुण, ६० ते ७० टक्क्यांसाठी तीन गुण असे) एक गुण कमी होणार आहे.
◆ पदव्युत्तर शिक्षण, डीएड, बी-एड आणि ’एम-एसआयटी’ अशा प्रत्येक पदवीसाठी दोन गुण अतिरिक्त मिळणार आहेत. त्यानंतर विधवा, अनाथ आणि अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवाराला प्रत्येकी दहा गुण जास्त मिळतील. 
◆ यापूर्वीचा किमान दोन वर्षांचा अनुभव असल्यास आणि आर्थिकदृष्ट्या मागास, भटक्या जाती-जमाती, ओबीसी उमेदवारांना प्रत्येकी पाच गुण जास्त मिळतील.

🤷🏻‍♀️ *अंगणवाडी सेविकांना मिळणार 'हा' लाभ* 
अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ, नवे मोबाइल, जागेच्या भाड्याच्या तुटपुंज्या रकमेमध्ये बदल, अंगणवाड्यांची संख्या वाढवणे यासारख्या बदलांबाबतही राज्य सरकारच्या पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे.

🤷🏻‍♀️ *अंगणवाडी सेविकांच्या भरती संदर्भात महत्त्वाचे..*
◆ प्रत्येक गावांमधील एक ते सहा वर्षांपर्यंतच्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी, अक्षर, अंक ओळख व्हावी या उद्देशाने अंगणवाड्या सुरु करण्यात आहेत. राज्यात एक लाख दहा हजारांपर्यंत अंगणवाड्या असून आणखी वाढीव अंगणवाड्यांचा प्रस्ताव आहे.
◆ अंगणवाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने राज्य सरकारने ९ जानेवारीला पदभरतीला मान्यता दिली आहे. पण, केंद्र सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार सेविकांसाठी शैक्षणिक पात्रता दहावीऐवजी बारावी करण्यात येणार आहे. त्यासंबंधीचा शासन निर्णय तयार झाला असून त्याला अंतिम मान्यता मिळाल्यानंतर तात्काळ भरतीला सुरवात होणार आहे.
◆ इच्छुक उमेदवारांना तालुक्याच्या *[ बालविकास प्रकल्प कार्यालयात ]* अर्ज करावे लागतील. त्यानंतर अर्जांची छाननी होऊन निकषांनुसार पात्र उमेदवारांची निवड केली जाईल. तत्पूर्वी, मदतनीस महिलांना सेविका म्हणून पदोन्नती दिली जाणार असून त्याच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. 

✅ *अशी असेल निवड प्रक्रिया* 
√ अर्जदारांची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध होणार; सेविकांसाठी बारावी तर मदतनीससाठी सातवी उत्तीर्णची पात्रता
√ तालुक्याच्या बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे उमदवाराने अर्ज करायचा
√ अर्जासोबत शैक्षणिक पात्रता, अनुभव प्रमाणपत्र, जन्म दाखला अशी कागदपत्रे अर्जासोबत असावीत
√ शैक्षणिक पात्रता सारखीच असल्यास अध्यापनाचा अनुभव पाहिला जाईल.
√ सर्वच उमेदवारांची शैक्षणिक पात्रता सारखी व अनुभवही नसेल तर जास्त वय असलेल्यास प्राधान्य असेल.
√ शैक्षणिक पात्रता, अनुभव, वय सर्व बाबी सारख्या असल्यास लॉटरी पद्धतीने उमेदवार निवडला जाईल.
√ बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी निवड केलेल्यांची व प्राप्त अर्जदारांची यादी शेजारील तालुक्यातील अधिकाऱ्यांकडून पडताळणी हाईल.


Post a Comment

Previous Post Next Post