रयतेच्या हिताचे रक्षण करणाऱ्या शिवाजी महाराज व हिंदवी संकल्पना घरा घरात रुजवा - भाजपा प्रदेश सदस्य संदीप कोरेत


 नरसिहंपली येथील टायगर ग्रुप आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रतिपादन 


 गडचिरोली :-हिंदवी स्वराज्याची निर्मीती करतांना छञपती शिवाजी महाराजांनी समस्त लोकांना सोबत घेवुन रयतेच्या हिताचे रक्षण केले शिवाजी महाराजांची स्वराज्य संकल्पना व शिवाजी महाराज घरा घरात रुजवा असे प्रतिपादन भाजपा आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य संदीप कोरेत यांनी केले.  नरसिहंपली येथे टायगर ग्रुप च्या वतीने आयोजित शिव जन्मोत्सव सोहळ्यात प्रमुख वक्ता म्हणून बोलत होते.
सिरोंचा तालुक्यातील नरसिहं पली येथे शिवजन्मोत्सव सोहळा टायगर ग्रुप च्या वतीने आयोजित करण्यात आले
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता संदीप कोरेत आदिवासी आघाडी प्रदेश सदस्य तथा जिल्हा कार्यकारी अध्यक्ष भाजपा यांनी होते तर प्रमुख अतिथी म्हणून रमेश पोलमपली केंद्रप्रमुख रेगुंठा,भास्कर मिसरी मु. अ.,मधुकर मडावी सामाजिक कार्यकर्ते,तिरुपती नसानी,स्वामीजी पोलमपली,राजेशम  तोगरीवार,श्रीनिवास चिलकमारी,अमित बेझलवार  विहिप जिल्हामंत्री,मधुकर परपटलावार,राकेश बिरदु बजरंग दल प्रमुख, संतोष चंदावार विहिप प्रमुख उपस्थित होते.

पुढे संदीप कोरेत म्हणाले कि,देशात मोघलांनी सत्ता काबिज केल्यानंतर मोघलांचे राजसत्ता अस्तित्वात आली या सत्तेत सर्वसामान्य जनतेवर अनेक कर आखुन मोघलांनी लुट मचवली होती  अपमानजनक वागणुक दिली जात होती. आपल्या मातित इतरांनी राज्य करणे हे जिजाऊंना मान्य न्हवते यासाठी स्वराज्याचा पाया रचण्यासाठी जिजाऊंनी लहानवयातच शिवरायांवर स्वराज्य निर्मितिचे संस्कार रुजविले स्वराज्याचा लढा उभारतांना शिवरायांनी जातिभेद व धर्मभेद ही संकल्पना स्पष्टपणे नाकारली आपल्या सैन्यात सर्व जातिधर्मातिल मावळ्याना मानाचे स्थान देवुन छञपती शिवाजी महाराजांनी धर्मनिरपेक्ष पद्धतिने हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. स्ञियांचा अपमान सहन केला नाही परस्ञिला आई व बहिनीप्रमाणे वागनुक दिली शिवाजी महाराजांचा राज्य कारभार आदर्श बाळगनारा आहे.या वेळी कार्यक्रम यशस्वीते करिता तिरुपती बेजन्नी, मुतूलू अग्गुवार, राजाबाबू राधारपू, श्याम चिलकामारी, नरेश पनगंटी, व्येकटेंश जाकेवार, श्रीनिवास कोम्मुला, राजमल्लू मानेम,व्येकटेश अग्गुवार नवीन पनगंटी, रवी सुपंटम सह टायगर ग्रुप चे सदस्यांनी सहकार्य केले.

Post a Comment

Previous Post Next Post