रेशनकार्ड-धारकांसाठी मोठी बातमी ! - मोफत राशन मिळत नसल्यास 'या' नंबरवर करा कॉल*


                  
📲 जर तुम्हाला स्वस्त धान्य दुकानदार मोफत धान्य देण्यास त्रास देत असेल तर आता त्याकडे दुर्लक्ष करु नका कारण यासाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांक उपलब्ध केले आहेत.

🤷‍♀️ *कुठं करता येणार तक्रार ?*

● केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला 1800 22 4950 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करता येईल.

● लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदाराची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने संकेतस्थळही उपलब्ध करुन दिले आहे. 

● लाभार्थ्यांना http://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या पोर्टलवरही करात येईल. तसेच या संकेतस्थळावर प्रत्येक राज्यासाठी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल. 

● अनेकदा रेशन कार्डसाठी अर्ज करुनही लाभार्थ्यांना लवकर रेशन कार्ड मिळत नाही. त्यांना अनेक महिने वाट पहावी लागते. याप्रकाराविरोधातही तक्रार करण्यात येणार आहे, असेही केंद्र सरकारने म्हटले आहे. 


Post a Comment

Previous Post Next Post