व्याघ्र संरक्षण दलातील मजुरांना त्वरित कामावर घेण्यात यावे..... देवानंद दुमाने यांची मागणी



आरमोरी : - वडसा वनविभाग अंतर्गत येणाऱ्या आरमोरी ,पोर्ला वनपरिक्षेत्रात वाघाचे अस्तित्व मोठया प्रमाणात असल्याने व्याघ्रबळीच्या घटना नेहमी घडताना दिसतात. मानव - वाघ संघर्ष कमी व्हावा या हेतूने वनविभाग प्रयत्न करीत आहे. परंतु वनविभागातील मनुष्यबळ कमी असल्याने व्याघ्रबळीच्या घटना दिसून येत आहेत..
         मागील तीन चार वर्षापासून आरमोरी व पोर्ला वनपरिक्षेत्रात वाघ बळीच्या घटना मोठयाप्रमाणात घडत असल्याने परिसरातील लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघ आणि मानव यातील संघर्ष कमी करण्यासाठी व्याघ्र संरक्षण दलातील मजुरांची भूमिका समन्वयाची आहे. मात्र अलीकडच्या काळात या मजुरांची नेमणूक बंद करण्याचे आदेश शासनाने दिल्याने मजुरांना कामावरून कमी करण्यात आले आहे.. आरमोरी परिक्षेत्रात जंगलालगत शेती असल्याने शेतीमध्ये उन्हाळी भात लागवड केली आहे. त्यामुळे नियमित शेतकरी, शेतमजूर यांचे शेतीवर आवागमन सुरू असते. या भागात वाघाचे अस्तित्व असल्याने शेतकऱ्यामध्ये भीतीचे सावट निर्माण झाले आहे. व्याघ्रदलातील मजूर कामावर असल्यास त्यांना वाघाची पूर्वमाहिती असल्याने वेळीच शेतकऱ्यांना सतर्क करून त्याभागात जाण्यास प्रतिबंधित केले जाते त्यामुळे होणारा संकट टाळता येतो... वाघ मानवीवस्तीच्या आजूबाजूला आल्यास त्याच्या अधिवासात हाकलण्यासाठी, नागरिकांची होणारी अनावश्यक गर्दी पागवण्यासाठी, जंगलात विनाकारण फिरणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेण्यासाठी तसेच घनदाट जंगलात एकटे वनरक्षक,वनमजूर जाणे शक्य नाही.जंगलात ट्रॅप कॅमेरे लावणे तपासणे बाहेरून आलेल्या वाघाची माहिती वनविभागाला पुरविणे हे सर्व कामे मजुराच्या साह्याने सोपे जातात. त्यामुळे भविष्यात होणारे अनर्थ टाळता येऊ शकतात. घटना घडल्यावर स्थानिक अधिकारी कर्मचारी यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते अशा घटनांना पायबंद घालण्यासाठी मजुरांना ताबडतोब वनकामावर घेण्यात यावे अशी मागणी वृक्षवल्ली वन्यजीवन संरक्षण संस्थेचे अध्यक्ष देवानंद दुमाने यांनी पत्रकातून केली आहे....

Post a Comment

Previous Post Next Post