वडील रागावले म्हणून अल्पवयीन मुलाने वडिलांवर कुऱ्हाडीने वार करीत केली हत्या


हिंगोली - वडील रागावले म्हणून अल्पवयीन मुलाने वडिलांवर कुऱ्हाडीने वार करीत हत्या केल्याची घटना हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील सेलू येथे घडली. Murder

विशेष म्हणजे सदर हत्याकांड लपविण्यासाठी कुटुंबाने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली होती, मात्र पोलीस आल्याने त्यांचं बिंग फुटलं. Crime news today
पोलिसांनी या प्रकरणात आरोपी अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. Hingoli crime news
सेलू येथील 42 वर्षीय भाऊराव कांबळे हे आपल्या कुटुंबासहित राहतात, कांबळे परिवाराकडे शेती नसल्याने ते दुसर्याच्या शेतीवर मजुरी करीत होते.





भाऊराव यांची पत्नी व 3 मुले अस त्यांचं कुटुंब होत, रात्रोच्या सुमारास भाऊराव यांचे मुलांसोबत किरकोळ कारणावरून वाद झाला, मात्र आईने मध्यस्थी करीत दोघांचा वाद सोडविला.
त्यानंतर रात्री झोपण्यापूर्वी पुन्हा भाऊराव व मुलाचा वाद सुरू झाला, भाऊराव आपल्या मुलावर जाम रागावले, अल्पवयीन मुलाला राग सहन न झाल्याने बाजूला असलेली कुऱ्हाड घेत भाऊराव यांच्या मानेवर वार केले. Crime in maharashtra
वार इतका जोरदार होता की भाऊराव यांचा जागीच मृत्यू झाला, घडलेल्या या प्रकाराने कांबळे कुटुंब हादरुन गेले.
सदर बाब कुणाला कळू नये यासाठी कुटुंबाने अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली, याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यावर त्यांनी कांबळे कुटुंबाची चौकशी केली असता किरकोळ भांडणावरून वाद आणि त्यानंतर सदर हत्या घडली अशी कबुली कुटुंबाने दिली.
वडिलांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post