मोहर्लीत वाघाने घेतला बळी...



मोहर्ली, :-
ताडोबा अंधारी बफर क्षेत्रात वाघाने हल्ला ( Tiger killed) करत एकाला ठार केले आहे. निळकंठ ननावरे (५५) असे मृतकाचे नाव आहे. ही घटना आज ८ जानेवारीला सकाळी १२ वाजताच्या दरम्यान घडली. माहितीनुसार, ताडोबा अंधारी बफर क्षेत्रालागत असलेल्या मोहर्ली गावाजवळील तलाव सांडव्यावरून मृतक नीलकंठ हे जंगलाकडे जात होते. दरम्यान झुडुपांमध्ये दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि जंगलात ओढत नेले. याबाबत वनविभागाला माहिती देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post