बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला महिलेने दिली खतरनाक शिक्षा, जिभेचा पाडला तुकडा आणि पोलिसांना दिला!




अनेकदा अशा घटना समोर येतात ज्या वाचल्यानंतर हैराण व्हायला होतं. ही घटनाही अशीच आहे. फ्रान्समध्ये एका व्यक्तीने एका महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याने तिच्यासोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर महिलेने जे केलं ते वाचून तुम्ही हैराण व्हाल आणि महिलेचं कौतुकही कराल.

फ्रान्सच्या एविगन्‍न शहरातील ही घटना आहे. डेली स्‍टारच्या रिपोर्टनुसार, एका महिला तिच्या डॉगीला बाहेर फिरवण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हा एका व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. तिचे कपडे फाडले. तिला मिठी मारली आणि किस करू लागला. महिलेच्या हा प्रकार लक्षात आला. तिने खूप संघर्ष केला. त्याच्यासोबत दोन हात केले. त्यानंतर किस करत असताना महिलेने दातांनी त्याच्या जिभेचा तुकडा पाडला.


त्यानंतर महिला कशीतरी पोलिसांकडे पोहोचली आणि सोबत जिभेचा तुकडाही घेऊन गेली. पुरावा म्हणून तो पोलिसांना दाखवला. हे बघून पोलिसही हैराण झाले. तिच्या हातावर रक्त होतं. जिभेचा तुकडा तिच्यासोबत होता. नंतर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आली. समोर आलं की, तो मूळचा ट्यूनीशियाचा राहणारा आहे. तो बेकायदेशीरपणे फ्रान्समध्ये आला होता. सरकारने त्याला लगेच देश सोडण्याचा आदेश दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post