कोतवालाने केली आत्महत्या


सावरगाव : तळोधी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वलनी येथे कोतवालाने घरात कुणीही नसताना सिलिंग पंख्याला इलेक्ट्रिक वायर बांधून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली. अनिल हरीजी गेडाम (४०) असे मृतकाचे नाव असून तो सावरगाव येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत होता.

तालुक्यातील वलनी येथील रहिवासी असलेला व सावरगाव येथील तलाठी कार्यालयात कोतवाल पदावर कार्यरत असलेला अनिल गेडाम याने पत्नी मिरची तोडायच्या हंगामासाठी बाहेर गावाला गेली असताना घरातील सिलिंग पंख्याला इलेक्ट्रिक वायर बांधून गळफास घेतला. याची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली. दरम्यान येथील पोलीस पाटील यांनी तळोधी पोलीस स्टेशनला याबाबत माहिती दिली. पत्नी बाहेरगावी कामावर, मुलीआश्रमशाळेत शिकायला आणि आई मुलीकडे राहत असल्याने घटनेच्या दिवशी अनिल घरी एकटाच होता.

१९ वर्षीय युवकाची गळफास घेऊन

आत्महत्या

कोरपना : पोलिस स्टेशन कोरपना अंतर्गत येत असलेल्या जेवरा येथील शेतशिवारात एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सुरज मेघशाम गोंडे (१९) रा. जेवरा असे मृतक युवकाचे नाव आहे. या युवकाने स्वतःच्या शेतातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. घटनेचा पुढील तपास कोरपना पोलिस निरीक्षक संदीप एकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश राठोड व कोरपना पोलिस करीत आहे.


Post a Comment

Previous Post Next Post