बोरचांदली पुलाजवळ भीषण अपघात… — दोन युवकांचा जागीच मृत्यू..


चामोर्शी रोडवरील बोरचांदली नदी पुला जवळ भीषण अपघात झाला असून दोन युवक जागीच ठार झाले असल्याची दुःखदायक घटना घडली.एस.टी.महामंडळच्या बसमध्ये व दुचाकीमध्ये जोरदार टक्कर झाली.या अपघातात दुचाकीस्वार संदीप कोकोडे फिसकुटी व प्रफुल्ल गुरुनुले फिसकुटी ठार झाले.

           बस क्रमांक MH07,C 9158 ही मूल वरून चामोर्शी कडे जात असताना विरुद्ध दिशे कडून येणारे दुचाकी स्वार हे अचानक समोर आल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.

       या अपघातात बस पलटी झाली बस मधील काही प्रवासी सुद्धा जखमी झाले.प्रवाशांना उपजिल्हा रुग्णालयात मुल येथे भरती करण्यात आले आहे.

        मुल पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून घटना स्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे व अपघात ग्रस्त मृत्यूदेहाला उत्तरणीय तपासणी साठी मुलं येथे हलविण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post