संत दौलत महाराज मठ्ठ येथे माघ पौर्णिमा उत्सव साजरा.. ....मुक्तापूर पेठ येथे माघ पौर्णिमा निमित्य सामूहिक विवाह सोहळा चे आयोजन

संत दौलत महाराज मठ्ठ येथे माघ पौर्णिमा उत्सव साजरा..

....मुक्तापूर पेठ येथे माघ पौर्णिमा निमित्य सामूहिक विवाह सोहळा चे आयोजन

.....४४ वर्षाची परंपरा दरवर्षी सोहळाचे आयोजन 





राजेंद्र बागडे 
नागपूर जिल्हा विभागीय प्रतिनिधी 

जलालखेडा पासून 3 किलो मिटर अंतरावर असलेले पेठ मुक्तापूर येथे मातंग समाज लग्न सोहळा ब परिचय मेळावा दर वर्षी हजारोच्या संख्येत पूर्ण विदर्भा मधून मातंग बांधव येथे येत असतात अण्णा भाऊ साठे व संत दौलत महाराज यांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात होत असते.या कार्यक्रमाला विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले गुरुदेव सेवा मंडळाकडून ग्राम स्वछता अभियान, समुदायीक प्रार्थना ,दीप प्रज्वलन , सहनाई, वादन , हरीनाम कीर्तन , त्या नंतर भोजन , गितगायन, भक्ती संगीत इत्यादी कार्यक्रम राबविण्यात आले. तसेच मातंग समाज बंधू परिचय मेळावा ब सामूहिक लग्न समारोह् घेण्यात येतात दुरुन् आलेले मुलं मुली एकमेकांना आपला परिचय देऊन लग्नासाठी विचारना करतात त्यात कुणाला लग्न करायचं असल्यास मंडळ त्यांचं लग्न सुद्धा लावून देतात , ४४ वर्षा पासून चालू असलेली प्रथा हे समोर जावे म्हणून् प्रबोधन करून तरुण पिठीला मार्गदर्शन केले जाते.ह्या सोहळा करिता नागरिक वर्षभर वाट पाहत असतात नागरिका मध्ये आनंदाचे वातावरण दिसून येते 


या कार्यक्रमाला प्रमुख्याने उपस्थित जि.प्. सदस्य सलील देशमुख , सहायक आयुक्त,प्रदीप बोरकर, डी.वाय.एस.पी. नागेश जाधव, , सरपंच सेवक माकोडे, लहानूजी इंगळे, महादेव जाधव , अरविंद डोंगरे, आनंद खडसे, संजय सोनटके, राहुल हिरवळे, श्रीधर रवींद्र खडसे, अतुल पेठे, उकेश् चव्हान्, प्रताप वानखडे, आदी मान्यवर होते
तसेच संस्थेकडून समाज सेवका चा विशेष सत्कार करण्यात आला त्या मध्ये चंद्रकांत वानखडे,(जेष्ठ सहित्यक्), डॉ० अशोक कांबळे, (माजी प्राचार्य) संजय ठोसर,( युवा प्रबोधन कार् व गायक) यांचा सत्कार करण्यात आला,

Post a Comment

Previous Post Next Post