गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली नवनिर्माण रस्त्याच्या आणि पुलाच्या बांधकामावरील 1 पोकलेन, 1 ट्रॅक्टर, 1 अजॅक्स (हायजक) मशीनची जाळपोळ


फाईल फोटो 


गडचिरोली ब्रेकिंग : नक्षल्यांनी केली नवनिर्माण रस्त्याच्या आणि पुलाच्या

बांधकामावरील 1 पोकलेन, 1 ट्रॅक्टर, 1 अजॅक्स (हायजक) मशीन ची जाडपोळ..

सूरजागडं आलेंगा - परसाळगोंदी मार्गावर होतें पुलाचे बांधकाम सुरू......

कामाच्या ठिकाणी असलेल्या मजुरांना दमदाटी करीत त्यांच्या समक्ष केले वाहनांना स्वाहा..

नागपूर येथील राईसी कंत्राटदाराच्या वतीने होते काम सुरू.....



नक्षल्याच्या एकाच हफ्त्यातील जाळपोळीची दुसरी घटना आसल्याने ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण....

घटनेची माहिती पोलीस अधीक्षक निलोतपल यांना विचारले असता घटनेला दुजोरा दिला असून घटनेसविस्तर माहिती मोकास्थळी पाहून देता येणार असल्याचे केले स्पष्ठ..


 एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी – अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षलवाद्यांकडून बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

Post a Comment

Previous Post Next Post