शेतीच्या वादावरून जिवे ठार मारणाऱ्या आरोपीस जन्मठेप व 25,000/- रू. व दंडाची शिक्षा



गडचिरोली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उदय बा. शुक्ल यांचा न्यायनिर्णय




सविस्तर वृत्त असे कि, यातील मृतक नामे राजक्का व्यंकटी बोल्हे वय ५० वर्ष रा. रेगुंठा ता. सिरोंचा व तिचे दोन सुना हे दिनांक ०३/११/२०१९ रोजी आपले शेतात मुंग पेरणीचे काम करीत असतांना त्याच गावातील आरोपी नामे समय्या अंकलु दुर्गम व त्याची पत्नी नामे लक्ष्मी अंकलु दुर्गम है त्यांचे शेतात कुन्हाड घेवुन आले व त्यांना म्हणाला की, ही जमिन माझी आहे असे बोलला असता फिर्यादीची सासु त्यास म्हणाली की ही जमिन आमची आहे. आम्ही पैसे देवुन विकत घेतली आहे. असे बोलली असता समय्या दुर्गम हा त्याचे हातातील कुन्हाड घेवुन सासुच्या अंगावर धावुन आला व कुन्हाडीने डोक्यावर, छातीवर मारल्याने ती खाली पडली तेव्हा गळयावर कुऱ्हाडीने वार केले. त्यावेळी मोनीका सासुला वाचविण्याकरीता आडवी आली असता मोनिकाच्या डोक्यावर व कमरेवर कुन्हाडीने वार केले मोनिका सुध्दा खाली पडली तेव्हा ही घटना पाहुन फिर्यादी आपला जिव वाचविण्याकरीता तेथुन पळत असतांना समय्या दुर्गमची पत्नीने फिर्यादीचा पाठलाग करून तिला सुध्दा मारहाण केली ती कशीतरी त्यांच्या तावडीतुन सुटुन रोडवर आली व गावात जावुन घडलेली सर्व हकिकत सासरे व्यंकटी बोल्हे यांना सांगीतली व पोलीस स्टेशन रेगुंठा येथे जावुन सदर घटनेबाबत रिपोर्ट दिली.

फिर्यादी नामे सौ. राजेश्वरी सडवली बोल्हे यांनी दिलेला तक्रार वरुन आरोपी विरोधात उप पोस्टे रेगुंठा अप.क्र. 06/2019 कलम 302, 307,323,109,506 भादवी अन्वये गुन्हा नोदं करण्यात आला.

पोलीस यंत्रणेने कौशल्यपुर्ण तपास करून आरोपी विरुध्द सबळ पुरावा मिळून आल्याने मा. न्यायालयात से.के.क्र. 23/2020 अन्वये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले. फिर्यादी व ईतर साक्षीदारांचे बयाण तसेच सरकारी पक्षाचा युक्तीवाद मा. न्यायालयाने ग्राहय धरून आज दिनांक 02/03/2023 रोजी आरोपी नामे समय्या अंकलु दुर्गम वय 46 वर्ष, रा. रेगुंठा ता. सिरोंचा याला मा. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री. उदय बा. शुक्ल गडचिरोली यांनी कलम 302 भादवी मध्ये जन्मठेप व 25,000/- रूपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.

सरकार पक्षातर्फे सहा. जिल्हा सरकारी वकील श्री. एस. यु. कुंभारे यांनी कामकाज पाहिले तसेच गुन्हाचा तपास पोउपनि / बाळासाहेब बी. सुर्यवंशी उपपोस्टे रेगुंठा यांनी केला आहे. तसेच संबधीत प्रकरणात साक्षदारांशी समन्वय साधुन प्रकरणाची निर्गती करीता कोर्ट पैरवी अधिकारी व कर्मचारी यांनी खटल्याच्या कामकाजात योग्य भुमीका पार पाडली.

Post a Comment

Previous Post Next Post