उमेद अंतर्गत महिलांची एकदिवसीय कार्यशाळा संपन्न*


महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान कक्ष देसाईगंज अंतर्गत कुरूड कोकडी प्रभागातील 11 ग्राम संघातील सामाजिक समस्या निवारण समिती च्या सदस्यांची एक दिवसीय कार्यशाळा आज दिनांक 2 मार्च 2023 ला प्रभाग संघ कार्यालय शिवराजपुर येथे पार पडले, त्यात महिलांच्या विविध समस्या व त्यावरील उपाय योजना याबाबत महिलांना प्रशिक्षण देण्यात आले त्यात प्रामुख्याने महिलांच्या आरोग्यविषयक,स्वच्छता विषयक सवयी बाबत मार्गदर्शन स्तनदा माता व गरोदर माता ची काळजी,लिंग भेदभाव, मासिक पाळी काळात घ्यावयाची दक्षता,पोषण परसबागेतून कुटुंबांना ताजा व सेंद्रिय भाजीपाला इत्यादी बाबतीत तालुका व्यवस्थापक अश्विनी गजभिये मॅडम, प्रभाग समन्वयक सचिन उपरे यांच्या मार्गदर्शनात समुदाय प्रशिक्षण सल्लागार सौ. जोत्स्ना गडे व सौ. रजनी बुद्धे यांनी ग्रामसंघ सॅक समितीतील सदस्यांनां प्रशिक्षण दिले. सदर प्रशिक्षणात कुरुड-कोकडी प्रभागातील सर्व ग्राम संघातील सॅक समितीतील 33 पदाधिकारी उपस्थित होते, सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभाग समन्वयक सचिन उपरे यांनी केले,तर आभार ग्राम संघ अध्यक्ष प्रणाली ताई राऊत यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post