होळीच्या दिवशी गावकऱ्याची केली नक्षलवाद्यांनी हत्या


छत्तीसगड:- जगदलपूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी एका गावकऱ्याची हत्या केली आहे.हि घटना होळी सणाच्या दिवशी 6 मार्च सकाळच्या सुमारास उघडकिस आली. गावकरी छुप्या पद्धतीने पोलिसांना माहिती देत असल्याचा कारणावरुन नक्षलवाद्यांना संशय होता.कोंडागावच्या पुंगारपाल पोलिस स्टेशन हद्दीतील तुमडीपारा खासपारा येथे नक्षलवाद्यांनी 6 गावकऱ्यांना बंधक बनवले.नंतर नक्षलवाद्यांनी 4 गावकऱ्यांना सोडून दिले परंतु 2 गावकऱ्यांना सोबत घेऊन जंगलात नेले.एका गावकऱ्याने त्यांच्या ताब्यातून कशीबशी सुटका करुन पळ काढला तर एकाला नक्षलवाद्यांनी ठार केले.त्यामुळे या परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गत पंधरवड्यापासून जिल्ह्याच्या अंतर्गत भागात नक्षलवाद्यांच्या हालचाली सातत्याने होत आहेत. नक्षलवादी सातत्याने एक एकामागून लहान - मोठ्या घटना घडवताना दिसतात.पुंगारपाल पोलिस ठाण्याचे तपास अधिकारी म्हणाले की ,गावकऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असुन प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.बारामासी कोरम असे मृताचे नाव आहे.या घटनेने पुंगारपाल परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

Post a Comment

Previous Post Next Post