गडचिरोली पोलिस पथक सी-60 च्या चकमकीत 3 नक्षली ठार


गडचिरोली : गडचिरोलीत पोलिसांनी ३ नक्षलवाद्याच्या खात्मा केला आहे. मृतकात पेरमिली दलम कमांडर बिठलु मडावीचा समावेश आहे.

मन्नेराजाराम जंगलातील ही घटना आहे. आताही चकमक सुरू असल्याची माहिती मिळत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली पोलिसांच्या सी-60 पथकाने चकमकीत तीन नक्षलवाद्यांचा खत्मा केला आहे. या चकमकीत पोलीस भरतीत सहभागी होणाऱ्या साईनाथची हत्या करणारा पेरमिली दलम कमांडर बिठलु मडावीचाही खात्मा झाला आहे. भामरागड तालुक्यातील मन्नेराजाराम जंगलात रविवारी सांयकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जवानांनी ही कारवाई केली आहे.


गडचिरोली पोलिसांचे सी-60 जवान मन्नेराजाराम जंगलात नक्षल विरोधी अभियान राबवत असताना लपून बसलेल्या नक्षलवाद्यांसोबत चकमक उडाली. या चकमकीत तीन पुरुष नक्षलींचा खात्मा केला आहे.

चकमकीत खात्मा झालेल्या नक्षल्यात एक पेरमिली दलम कमांडर बिटलु, सदस्य वासु,तसेच अहेरी दलम सदस्य श्रीकांत चां समावेश असून घटनास्थळी नक्षल साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश प्राप्त झाले असून घटनास्थळी सर्चीग ऑपरेशन सुरू असून पाऊस येत असल्याने तसेच घनदाट जंगल असल्याने मोठी अडचण निर्माण होत आहे.


नक्षलीमधील एकाची ओळख पटली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली. महाराष्ट्र दिनाच्या तोंडावर गडचिरोली पोलिसांनी केलेली ही कारवाई नक्षलवाद्यांसाठी मोठा झटका मानला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post