विद्यार्थ्याची शहरात आत्महत्या



 गडचिरोली : शहरातील रामनगर येथे अभियांत्रिकेचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २३ एप्रिलला घडली.

अमन मारोती निकुरे (२१) असे मयताचे नाव आहे. तो पुणे येथे मराठवाडा मित्रमंडळ अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. सलग दोन वर्षे तो परीक्षेत अनुत्तीर्ण झाला. त्यामुळे तो निराश होता. यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आकस्मिक मृत्यूची नोंद असून, गडचिरोली ठाण्यातअधिक तपास सुरू आहे.



Post a Comment

Previous Post Next Post