देऊळगावात वाघाने वासराला फरफटत नेत केले ठार


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

 कुरखेडा : वडसा वनपरिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव येथे वाघाने गावातून गायीच्या बछड्याला फरफटत नेत तलावात ठार करत फस्त केले. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. देऊळगाव येथील शेतकरी जयंता वासुदेव खुणे यांच्या मालकीच्या गायीचा वासराला फरफटत नेत ठार केल्याने गावात व परिसरात दहशत निर्माण झाली आहे. गावापर्यंत वाघ येऊन पोहोचल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. शेतात असलेलया पिकाला पाणी पुरवठा करण्याकरिता शेतकऱ्यांना रात्री-बेरात्री गावालगत तसेच जंगलालगत असलेल्या शेतात जावे लागते. मात्र, परिसरात वाघाचा वावर असल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी ग्रा.पं. सदस्य राकेश खुणे यांनी केली...

Post a Comment

Previous Post Next Post