गळफास घेऊन वृद्धेची आत्महत्या



दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

गडचिरोली घरालगतच्या शेतातील एका झाडाच्या फांदीला गळफास घेऊन वृद्ध महिलेने आत्महत्या केली. ही घटना गडचिरोली तालुक्याच्या चांभार्डा येथे गुरुवारी घडली.

राईबाई किरंगे (७०, रा. चांभार्डा) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. राईबाई किरंगे यांचे घर चांभार्डा टोली येथे अगदी शेवटच्या टोकावर आहे. दुपारच्या सुमारास राईबाई ही घरी आढळली नाही. तेव्हा तिचा शोध घेतला असता. घरालगतच्या शेततळ्यातील एका झाडाला राईबाई ही गळफास घेतल्याच्या स्थितीत आढळली. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलिस पाटील अश्विनी मेश्राम यांना दिली.


Post a Comment

Previous Post Next Post