सामाजिक प्रबोधन मेळ्याव्याचे आयोजन करून सामाजिक जनजागृती करने गरजेचे......!!* *!!खासदार. अशोकजी नेते यांचे मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी प्रतिपादन!!*


दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी 

----------------------------------------------
*दिं.०७ एप्रील २०२३*
*गडचिरोली:-लोहार समाजाचा मेळावा,विश्वकर्मा जयंती,विद्यार्थी व मान्यवरांचा सत्कार, तथा वधु वर परिचय कार्यक्रम*
*अभिनव सभागृह मुल रोड,गडचिरोली येथे खासदार अशोकजी नेते यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.*


*गडचिरोली जिल्हयात मोठया प्रमाणात लोहार समाज वास्तव्य करीत आहेत परंतु स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही लोहार समाज स्वतःचा पारंपारिक व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करून जीवन जगत आहे*
*व लोहार समाज आजही सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक बाबतीत*
*मागासलेला समाज आहे त्यांचा सामाजिक जीवनात सर्व बाबतीत बदल व्हावा यासाठी लोहार समाज संघटना गेल्या अनेक वर्षापासून जिल्हात काम करीत आहे* *परंतु अनेक लोहार समाज बांधव लोहार समाज संघटने द्वारा आयोजित विविध कार्यक्रमात उपस्थित राहत नाही त्यामूळे विविध योजनांची माहिती त्यांना मिळत नाही अशी खंत लोहार समाज संघटना द्वारा व्यक्त करण्यात आली* *परंतु महाराष्ट्र राज्य लोहार तत्सम समाज संघ जिल्हा संघटना द्वारा आज जनजागृती व समाज प्रबोधन मेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या आयोजित कार्यक्रमात उद्घाटक गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोकजी नेते व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ देवराव होळी मा. ऋषिदेव येरमे आकापुर , सुरेशजी मांडवगडे* *जिल्हा अध्यक्ष म,राज्य लोहार व तत्सम समाज संघ , ल ना ,मोरे माजी सल्लागार तत्सम समाज संघ यांनी मार्गदर्शन केले* 


*यावेळी प्रामुख्याने भाजप जिल्हा उपाध्यक्ष अनिल भाऊ पोहनकर,*
*नंदू भाऊ कुमरे ,वी संघटक शिवसेना व वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती समाजाचे नागपूर येथील प्रमूख पदाधिकारी प्रामुख्याने अनेक कार्यकर्ते उपस्थित होते* 
*यावेळी खासदार अशोकजी नेते यांचा समाज बांधवांच्या वतीने खासदार अशोकजी नेते यांचा जाहीर सत्कार करण्यात आला , उपास्थित सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करतांना*
*खासदार अशोकजी नेते यांनी या प्रसंगी बोलतांना तमाम समाज संघटना द्वारा समाज प्रबोधन कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे व या आयोजित कार्यक्रमाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या व राज्य शासनाच्या विविध* *योजनांची माहिती सर्वसामान्य गोरगरीब समाज बांधवांना एकत्रित करून देणे काळाची गरज आहे व केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्य गोरगरीब समाज बांधवांच्या नेहमीच पाठीशी आहे* *असे प्रतिपादन केले*


*यावेळी महाराष्ट्र राज्य तत्सम लोहार समाज संघाचे हजारो पदाधिकारी कार्यकर्ते व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते* *आयोजित समाज प्रबोधन मेळावा यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ जिल्हा गडचिरोली व वैदर्भीय गाडी लोहार समाज* *संघटना जिल्हा गडचिरोली येथील पदाधिकारी कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केला*

Post a Comment

Previous Post Next Post