कुरुड येथील इसमाने घेतला गळफास


कुरूड :- देसाईगंज तालुका मुख्यालयापासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या कुरुड येथील गेंदलाल किसन ठाकरे वय ४५ वर्षे या इसमाने पहाटे ६ ते ६.३० वाजताच्या सुमारास घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज १८ एप्रिल २०२३ रोजी उघडकीस आली आहे.

सविस्तर वृत्त असे की, गेंदलाल ठाकरे यांच्या घरी काही नागरिक गेले असता घराच्या आतमधून दार बंद असल्याचे आढळून आले. बराच वेळ गेंदलाल ठाकरे यांना आवाज देऊन व दार ठोठावूनही त्यांनी कसलाही प्रतिसाद न दिल्याने काही जणांनी गावातील पोलीस पाटील मंगेश मडावी यांना सदर प्रकरणी माहिती दिली. पोलीस पाटील व नागरिकांनी दार उघडुन बघता गेंदलाल ठाकरे हे घरातीलच एका खोली मध्ये घळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. लगेच पोलीस पाटील मंगेश मडावी यांनी सदर घटनेची माहिती देसाईगंज पोलीस प्रशासनास दिली. देसाईगंज पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन सदर प्रेत शविच्छेदनाकरीता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात नेले असल्याची माहिती मिळाली आहे. आत्महत्येचे कारण अद्यापही कळलेले नसून पुढील तपास देसाईगंज पोलीस विभाग करीत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post