मोठी बातमी! - आता ग्राहकांना भरावे लागणार एकसारखे दोन महिन्याचे वीज बिल



💵 वीज ग्राहकांना इकसारखे दोन महिन्यांचे वीज बिल भरावे लागणार आहे कारण नव्या वीजदरांसोबतच या महिन्यातील वीज देयकांत दोन महिन्यांच्या सुरक्षा ठेवीची रक्कमही जोडण्यात आली आहे.

💁‍♂️ *पहा काय आहे कारण*

✍️ वीज ग्राहकांना सुरक्षा ठेव म्हणून वितरण कंपनीकडे ठराविक रक्कम जमा ठेवणे बंधनकारक असते. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही रक्कम वर्षभरातील दोन महिन्यांच्या सरासरी देयकाइतकीच असते.

💫 मात्र सन २००३ मध्ये वीज नियामक आयोगात बाजू मांडत ही ठेव एक महिन्याच्या देयकाइतक्या रकमेवर आणली होती, पण आता महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नियमांमध्ये बदल करीत, पुन्हा वर्षभरातील सरासरी देयकाच्या दोन महिन्यांइतकी रक्कम आकारण्याचा निर्णय घेतला आहे.

📍*वीज ग्राहकांना दोन महिन्याचे वीज बिल एकसोबत भरावे लागणार* - हि बातमी सर्व नागरिकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा


Post a Comment

Previous Post Next Post