गुड्डीगुडम येथील तलावात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा



अमृत सरोवर उपक्रमाअंतर्गत पंचायत समिती अहेरी चे पुढाकार

अहेरी:-  तालुक्यातील गुड्डीगुडम येथील मामा तलावाच्या निसर्गरम्य वातावरणात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच अनिल पेंदाम यांच्या हस्ते करण्यात आले. 
पंचायत समिती अहेरी चे जल सिंचाई शाखा अभियंता एम.के.वाळके यांच्या उपस्थितीत  योगा व प्राणायामाचे  धडे घेण्यात आले. तसेच त्यांनी शास्त्रीयपद्धतीने योगाचे शारीरिक व मानसिक लाभ याबाबत प्रात्यक्षिकातून सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी उपसरपंच प्रफुल नागुलवार, देवाजी भुजाडी, आदित्य ओनपाकला, ग्रा. प. शिपाई श्रीनिवास आईलवार, विलास मडावी,पवन गंगारेड्डीवार,प्रमोद कोडापे, विलास सडमेक ,सत्यवान आत्राम,तसेच आदी युवक उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post